आग्रा येथे पती-पत्नी आणि ‘तो’चे प्रकरण समोर आले आहे. पतीला आपल्या पत्नीवर अनेक दिवसांपासून संशय होता. एके दिवशी पत्नी न सांगता घरातून निघून गेल्यावर पतीची शंका बळावली. पती तिच्या मागावर गेला आणि आपल्या पत्नीला त्याने तिच्या प्रियकरासोबत स्कूटीवरून जाताना पकडले. यावेळी या व्यक्तीसोबत त्यांची मुलगीही होती. म्हणजेच मुलीनेही आपल्या आईला परपुरुषासोबत पाहिले. पत्नी आणि तिच्या पुरुष मित्राचे वाहन थांबवण्यासाठी पतीने व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पत्नीला भलत्याच पुरुषाच्या गाडीवरून जाताना पाहिल्यावर पती जोरजोरात ओरडू लागला. यावेळी आजूबाजूचे लोकही घटनास्थळी जमा झाले. पत्नीच्या मित्राचे वाहन थांबवल्यावर दोघांमध्ये भांडण झाल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी शांतता भंगाच्या कलमांखाली महिलेचा पती आणि प्रियकराला चालान दिले. तसेच भविष्यात असे न करण्याचा इशारा दोघांना देण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)