हमीरपूरमध्ये एका वरातीमध्ये 12 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. वऱ्हाडाला नाचताना पाहून घोडा बेभान झाला. गाण्याचा मोठा आवाज ऐकून घोडा वरातीमध्ये धावू लागला. भान सुटलेल्या घोड्यामुळे 12 जण जखमी झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये वऱ्हाड मिरवणुकीत गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांच्यामधून घोडा धावू लागतो, ज्यामध्ये वऱ्हाडी मंडळी जखमी झाली आहेत. ही घटना हमीरपूरच्या मौदाहा शहरातील आहे.

रविवारी गुसियारी गावातून मिरवणूक मौदहा शहरात आली होती. ज्यात वऱ्हाडी डीजेच्या तालावर नाचत होते. अचानक घोडासुद्धा त्यांच्यामध्ये आला आणि उड्या मारू लागला. तिथून तो पाळू लागला. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)