Viral Video: होळीच्या सणादरम्यान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेजवळ असलेल्या छिंदवाडा जिल्ह्यातील जाम सावली हनुमान मंदिरात एक अनोखी घटना घडली, घटनेमुळे सगळेच चक्रावून गेले. महाआरती करत असताना एका महिलेच्या हाताला साप गुंडाळलेला दिसला. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या सापाने महिलेला कोणत्याही प्रकारे इजा केली नाही आणि काही वेळाने शांतपणे महिलेचा हात सोडला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि लोक लगेचच याला एका चमत्काराशी जोडू लागले. मंदिर सौसर मुख्यालयापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि श्री हनुमानाचे हे मंदिर चमत्कारासाठी  प्रसिद्ध आहे, जिथे हनुमानजींच्या नाभीतून सतत पाणी वाहते. असे मानले जाते की, सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीला उपस्थित राहून हनुमानजीच्या नाभीतून निघणारे पाणी ग्रहण केल्यास मानसिक आजार दूर होतात आणि दुष्ट आत्म्यांपासून बचाव होतो. त्यामुळे अशा समस्यांनी त्रस्त लोकांसाठी येथे जत्रा भरते.

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)