जगामध्ये उपोद्यावी लोकांची कमी नाही. असे अनेक नमुने आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. अशाच एका नमुन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नौशाद असे या व्यक्तीचे नाव आहे. या पठ्याने उच्च प्रवाह असलेल्या विद्युत तारांना लटकण्याचा प्रताप केला. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील अमरिया शहरात ही घटना घडली. घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शहरात पाऊस पडला होता. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे नौशादचे प्राण वाचू शकले. अन्यथा त्याला तेथेच मृत्यूने गाठले असते. त्याचे असे जीवघेण्या पद्धतीने लटकणे पाहून उपस्थितांचाही थरकाप उडाला.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)