वाराणसीच्या मणिकर्णिका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. या ठिकाणी एका मुलाने आपल्या वडिलांच्या चितेवर दारू ओतली, तसेच सुपारी आणि विडी ठेवली. वडिलांची कोणतीही इच्छा अपूर्ण राहायला नको, त्यामुळे त्याने अंत्यसंस्कार करताना ही अंतिम औपचारिकता पूर्ण केली. हे दृश्य काशीच्या लोकांसाठी सामान्य असले तरी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी धक्कादायक होते. असा विचित्र अंत्यसंस्कारात हे पाहून ते थक्क झाले.

मणिकर्णिका घाटावरील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, असे दृश्य स्मशानभूमीत दररोज पाहायला मिळते. या ठिकाणी मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दारू, गांजा, विडी, सिगारेट, बिडी अर्पण करणे सामान्य आहे. काशीच्या लोकांच्या म्हणण्यानुसार आपण आयुष्य जेवढ्या उत्साहाने जगतो, तेवढ्याच उत्साहाने इथे मृत्यूही साजरा केला जातो. (हेही वाचा: Rats Feast On IRCTC Food Stall: रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फूड स्टॉलवरील अन्नावर उंदीर धावताना दिसले, व्हिडिओ व्हायरल)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)