Monkey Steals iPhone: वृंदावन (Vrindavan) येथील श्री रंगनाथ जी मंदिरात एका माकडाने एका व्यक्तीचा आयफोन (iphone) चोरल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ विकास या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये इमारतीवर दोन माकडे बसलेली दिसत आहेत. यातील एका माकडाच्या हातात आयफोन आहे. फोनचा मालक माकडाकडे 'मँगो फ्रूटी' फेकून आपला फोन परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अखेरीस माकड त्यास फसतो. फ्रूटी जवळ येताच तो आपल्या हातातील आयफोन खाली सोडतो आणि फ्रूटी पकडतो. अशाप्रकारे अनेक प्रयत्न करून फोनचा मालक आपला आयफोन परत मिळवण्यास यशस्वी ठरतो. हा व्हिडिओ 6 जानेवारी रोजी शेअर करण्यात आला होता. (हेही वाचा: Dead Mouse Found in Barbeque Nation Veg Meal Box? मुंबईच्या बार्बेक्यू नेशनच्या शाकाहारी जेवणामध्ये मृत उंदीर आढळल्याचा दावा; दूषित अन्न खाल्ल्यानंतर व्यक्ती रुग्णालयात दाखल)
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)