लखनऊच्या जनेश्वर एन्क्लेव्ह अपार्टमेंटमध्ये एक 5 वर्षांची मुलगी तब्बल 20 मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहे. लिफ्टमध्ये मुलगी ओरडत राहिली, तसेच मदतीची याचना करत राहिली. मुलीने अनेकवेळा दोन्ही हातांनी लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न केला. काही काळानंतर मुलीची अवस्था अतिशय बिकट झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बऱ्याच वेळानंतर मुलीला लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बबिता म्हणाल्या की, अपार्टमेंटमध्ये लाईटच्या खूप समस्या आहेत, त्यामुळे अशा घटना घडतात. यापूर्वीही अशीच लिफ्ट अडकली होती. आज ही मुलगी लिफ्टमध्ये अडकल्याने तिचे कुटुंबीय लिफ्टबाहेर प्रचंड अस्वस्थ झालेले दिसले. अपार्टमेंटच्या सुपरवायझरने सांगितले की, लाईट फेल झाल्याने मुलगी लिफ्टमध्ये अडकली होती. काही वेळाने मुलगी लिफ्टमधून बाहेर आली. (हेही वाचा: Baby Found Alive Before Cremation: आसाममध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केलेले नवजात अर्भक अंत्यसंस्कारापूर्वी आढळले जिवंत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)