नदीत बुडालेल्या लहान मुलाचा मृतदेह शोधण्यात अपयश आल्याने कुटुंबीयांनी निराशा व्यक्त केली. दरम्यान, याच नदीतून एका मगरीने या मुलाचा मृतदेह बचाव शोध पथकाच्या दृष्टीस आणून दिल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. साधारण 1 मिनीट 11 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मगर लहान मुलाचा मृतदेह आणून देताना दिसते. ही घटना इंडोनेशियातील मुआरा जावा येथे घडली. गल्फ टुडेच्या वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या पूर्व कालीमंतन भागातील महाकम नदीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. महंमद झियाद विजया (4) असे मृत मुलाचे नाव आहे. व्हिडीओमध्ये मगरीचा मृतदेह शोध आणि बचाव पथकाकडे परतताना आणि लगेच नदीपात्रात गायब होताना दिसत आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)