Indonesia Plane Crash: पापुआ (Papua) येथे सेरुई मधील स्टीव्हनस रुम्बेवास विमानतळावर त्रिगाना एअरचे ATR 42-500 विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे मोठा अपघात (Indonesia Plane Crash) झाला. अपघातावेळी विमानात 42 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सोमवारी 9 सप्टेंबर रोजी टेकऑफ दरम्यान ही घटना घडली. अपघातावेळी मोठा आघात झाल्याने काही प्रवासी जखमी झाले. सध्या अधिकारी विमानाचे नुकसान आणि विमानतळाच्या कामकाजाचे मूल्यांकन करत आहे.
विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे मोठा अपघात
Trigana Air ATR 42-500 significantly damaged after a runway excursion at Serui Stevanus Rumbewas Airport in Indonesia.
It's been reported that the incident occurred when the crew aborted the takeoff from runway 28, for reasons currently unknown.
All 42 passengers and six… pic.twitter.com/VJhrQMyE5A
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) September 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)