Bride Sleeping Video: बदलत्या काळानुसार विवाहसोहळ्यांची चमकही दिवसेंदिवस वाढत आहे. वधू आणि वर त्यांचे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी, तसेच लग्नासाठी खास पोशाख तयार करण्यासाठी खास योजना बनवतात. मात्र, लग्नाचे सोहळे पार पाडताना सर्वांनाच थकवा जाणवतो. यात सर्वात जास्त थकवा वधूला येतो. जड दागिने, लेहेंगा आणि मेकअप सोबतचं नववधू सर्व विधी करून थकतात. अशाचं एका सुंदर नवरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, ही नववधू तिच्या लग्नात इतकी थकली होती की, ती विधी सुरू असताना झोपी गेली. या नववधूच्या सौंदर्यावर आणि या झोपाळू शैलीवर नेटिझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)