Zero Waste Wedding Viral Video: तुम्ही भारतीय लग्नसमारंभाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या लग्नाबद्दल सांगणार आहोत. परंतु, या झिरो-वेस्ट लग्नाच्या व्हिडिओने इंस्टाग्रामवर सर्वांची मने जिंकली आहेत. यामध्ये सजावटीपासून खाण्यापिण्यापर्यंत कमीत कमी अपव्यय आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ डॉ. पुर्वी भट नावाच्या युजरने 'इन्स्टाग्राम'वर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला माहित नाही की तज्ञ हे झिरो-वेस्ट वेडिंग मानतील की नाही? परंतु आम्ही या कार्यक्रमात प्लास्टिकचा कचरा निर्माण केला नाही आणि पर्यावरणाचा नाश कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आमच्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळेच माझे झिरो-वेस्ट लग्नाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. या सगळ्यामागे माझी आई होती. तिने संपूर्ण कार्यक्रमाची योजना आखली होती."
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मंडप पूर्णपणे नैसर्गिक ऊस आणि पानांच्या साहाय्याने बांधण्यात आला आहे. पाहुण्यांना परतीच्या भेटवस्तू म्हणून ज्यूटच्या पिशव्या देण्यात आल्या आहेत. तसेच डिस्पोजेबल कप आणि प्लेट्सऐवजी केळीच्या पानांवर जेवण दिले गेले आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि वापरण्यात आलेले पाणी आजूबाजूच्या हिरवळीला पाणी देण्यासाठी वापरता यावे, यासाठी झाडांजवळ लोकांना हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फॅन्सी सजावटीऐवजी आंबा आणि नारळाच्या झाडांच्या देठ, पाने आणि डहाळ्यांचा सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे. ज्या शेतात विवाह झाला, तेथे उरलेल्या कचऱ्यापासून खत तयार करता येईल, अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.
पहा व्हिडिओ -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)