PM Modi Birthday: एका कुपोषित मादी चितेसह नामिबियातून (Namibia) सुमारे 8 चित्ते (Cheetah) भारतात आणली जात आहेत. अशा परिस्थितीत नामिबियातून चित्त्यांना भारतात आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी बोईंग 747 मधून सर्व इकॉनॉमी सीट्स काढून टाकण्यात आल्या आहेत. 1952 मध्ये भारत सरकारने चित्ताला देशातील नामशेष प्राणी म्हणून घोषित केले होते. सरकारने 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला या प्रजातीचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू केले. यावर्षी 20 जुलै रोजी भारत सरकारने नामिबियाशी करार केला. चित्ता संवर्धनासाठी नामिबिया भारताला 8 चित्ते देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये या आठ चित्त्यांना सोडण्याची शक्यता आहे.
नामीबिया से चीतों को भारत लाने के लिए एक विशेष उड़ान की व्यवस्था की गई है। आसान परिवहन के लिए बोइंग 747 से सभी इकॉनमी सीटों को हटा दिया गया है। pic.twitter.com/2XL7MUcbfZ
— प्रसार भारती न्यूज सर्विसेज एवं डिजिटल प्लेटफॉर्म (@PBNS_Hindi) September 15, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)