Lakhimpur Kheri: लखीमपूर खेरी जिल्ह्यातील पालिया परिसरातील फुलवारिया गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाघाने एका महिलेवर हल्ला (Tiger Attacke Woman) केला. या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्या वाघावर हल्ला करून त्याला ठार (Tiger Beaten to Death) मारले. वाघाच्या हल्ल्याच्या घटनेमुळे या भागातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत होते. अखेर आज ही दुर्घटना घडली. मिळालेल्या वृत्तानुसार, वाघ जवळच्या जंगलातून गावात घुसला होता. त्यानंतर त्याने समोर आलेल्या महिलेवर हल्ला केला. ज्यामध्ये ती जखमी झाली. हल्ल्याची बातमी पसरताच ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. ते मोठ्या संख्येने जमले आणि वाघाशी सामना केला. संताप आणि भीतीच्या भरात, ग्रामस्थांनी काठ्या आणि इतर शस्त्रे घेऊन वाघावर हल्ला केला ज्यात तो मारला गेला. (Gurugram Shocker: सहकाऱ्यांसोबत ब्रेक घेण, वेळेत ऑफिसमधून निघणे कर्मचाऱ्याला नडले; 20 व्या दिवशी कंपनीने दिला नारळ, रेडिटवर तरूणाची खळबळजनक पोस्ट)
ग्रामस्थांकडून मारहाण; वाघाचा जागीच मृत्यू
यूपी:लखीमपुर खीरी जिले के पलिया इलाके के फुलवरिया गांव में एक बाघ द्वारा महिला पर किए गए हमले के बाद ग्रामीणों ने बाघ को पीट पीट कर मार डाला। वन विभाग ने बाघ के शव को अपने कब्जे में ले लिया है। pic.twitter.com/ZL0US6HWRY
— Gagandeep Singh (@GagandeepNews) February 26, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)