Office Work प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Gurugram Shocker: सध्या रेडिटवर (Reddit) शेअर झालेली पोस्ट चर्चेत आहे. गुरुग्राममधील (Gurugram) एकाने कामाच्या ठिकाणी त्याला मिळालेल्या वागणूकीवर खळबळजणक पोस्ट केली आहे. कामावर रुजू झाल्यावर अवघ्या 20 दिवसात त्याला अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. कंपनीने त्याचे वर्तन ठीक नसल्याचे सांगत त्याला कामावरून काढून टाकल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र, त्याने कंपनीने केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. वेळेवर काम बंद करून घरी जाणे, सहकाऱ्यांसोबत ब्रेक घेणे (man gets fired for taking tea breaks)हे त्याच्या वरिष्ठांना ना पसंत होते. त्यांनी अनेक वेळा त्याला असे करण्यापासून थांबवल्याचे ही त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. (High Work Pressure: भारतात 66% कर्मचारी कामाच्या दबावाखाली, 45% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना रविवारी संध्याकाळी जाणवते चिंता व अस्वस्थता- Report)

रेडिट पोस्ट

रेडिटवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, कर्मचाऱ्याने सांगितले की, कंपनीत रुजू झाल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल वरिष्ठांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याला सांगण्यात आले की त्याची काम करण्याची पद्धत "वाईट वृत्ती" ची आहे आणि "तो डाऊन टू अर्थ नाही." वरिष्ठांच्या अशा तक्रारीनंतर त्याला धक्का बसला. त्याला समजले नाही की वरिष्ठांकडून त्याच्याकडे अशा पद्धतीने का पाहिले जात आहे. त्यावर कर्मचाऱ्याने 'मी त्यावर काम करेन', अशी प्रतिक्रीया दिली. हे सगळे त्याने कामावर रुजू झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसात घडले. शेवटच्या दिवशी वरिष्ठांनी त्याची काम करण्याची जागा बदलली. त्याला त्याच्या डेस्कवरून हटवून थेट संचालकांच्या केबीनमध्ये बसवायला सुरूवात केली.

तो अस्वस्थ झाला. दिवसभर डायरेक्टरसोबत केबिनमध्ये बसून कोण काम करतो? असा प्रश्न त्याने पोस्टमध्ये उपस्थित केला. दिवसाच्या शेवटी, त्याने केबिनच्या बाहेर डोकावून त्याचे सहकारी अजूनही चहाच्या ब्रेकवर आहे का? हे पाहण्याचा प्रयत्न केला. डायरेक्टरला त्याची ही छोटीशी गोष्ट असह्य झाली. डायरेक्टरने त्याला फटकारले आणि विचारले, “तू बाहेर का पाहत आहेस? आणि ताबडतोब एचआरला बोलावले आणि त्याला काढून टाकण्यास सांगितले.

Got terminated recently from my job

byu/False-Echidna8747 indelhi

ब्रेक घेण्याच्या सवयीमुळे नाराज

कर्मचाऱ्याने सांगितले वरिष्ठ त्याचे इतर दोन नवीन कर्मचाऱ्यांसोबत चहापानाच्या ब्रेक घेण्याच्या सवयीमुळे नाराज होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, "गट बनवू नका, ते कंपनीसाठी चांगले नाही." याशिवाय, वेळेवर काम बंद करणे देखील चुकीच्या दृष्टीने पाहिले जात असे. कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तो दररोज संध्याकाळी 7 वाजता ऑफिसमधून बाहेर पडत होता. त्याला याबद्दल विचारणा व्हायची. त्याला वारंवार सांगण्यात आले, "तू ठीक 7 वाजता निघत आहेस, हे चांगले लक्षण नाही."