आजकाल मोबाईल हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. फोनशिवाय लोक एक मिनिटही जगू शकत नाहीत. कधी कधी या स्मार्टफोनमध्ये लोक इतके व्यस्त होतात की, त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याची पर्वाही नसते. फोनवर बोलत वाहन चालवताना अनेक अपघात घडल्याचे आपण ऐकले असेल. आताही या फोनबाबत एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी रुळावर बसून आरामात फोनवर बोलत आहे आणि अचानक ट्रेन येते व तिच्या अंगावरून जाते. परंतु फोनवर बोलत असलेल्या या मुलीवर अंगावरून ट्रेन जाण्याचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसून येते. ट्रेन अंगावरून जात असताना फोन तिच्या कानालाच लागलेला असतो व ट्रेन गेल्यावरही ती फोनवर तशीच बोलत राहते.
फ़ोन पर gossip, ज़्यादा ज़रूरी है 🤦🏻♂️ pic.twitter.com/H4ejmzyVak
— Dipanshu Kabra (@ipskabra) April 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)