Snake vs Human: छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यातील भेडिया गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाला साप चावला, त्यानंतर तरुणाने सापाच्या डोक्याचा काही भाग खाला. यानंतर काही वेळातच तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. ग्रामीण भागात पसरलेल्या गैरसमजातून तरुणाने हे जीवघेणे पाऊल उचलल्याचे समजते. साप चावल्यानंतर आपणही त्या सापाचा चावा घेतला तर सापाच्या विषावर कोणताही परिणाम होत नाही, अशी ग्रामीण भागात समज आहे.
अहवालानुसार, प्रतापूर विकास गटातील भेडिया गावात राहणारा कोमा नेताम (32) उकाड्यामुळे रात्री घराच्या अंगणात झोपला होता. रात्री उशिरा अचानक त्याचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय बाहेर आले. त्यावेळी त्यांना कोमा नेतामच्या शेजारी एक साप पडलेला दिसला. सापाच्या डोक्याचा काही भाग गायब होता. तरुणाने सांगितले की, सापाने त्याचा चावा घेतला होता, म्हणून त्यानेही सापाच्या डोक्याचा काही भाग खाल्ला. त्याच्या शरीरावर ज्या ठिकाणी सापाने चावा घेतला होता, तिथला भाग कापून त्याने रक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून विष शरीरात पसरू नये. कोमा नेतामला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा:
Python Swallows Woman in Indonesia: इंडोनेशियामध्ये 16 फुट महाकाय अजगराने महिलेला पूर्णपणे गिळंकृत केले; पोटात आढळला मृतदेह)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)