School Students Steal Laddu: देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. गणेश मंडळामध्ये बाप्पासाठी लाडूंसह मोदकांचा प्रसाद मोठ्या प्रमाणात दिला जातो. गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान, हैदराबादच्या चारमिनार पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या घांसी बाजार गणेश मंडपममध्ये मुले लाडू चोरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही शाळकरी मुले मंडपात प्रवेश करतात आणि लाडूची चोरी करतात आणि पळून जातात. दरम्यान, तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. दोन अल्पवयीन मुलांसह चार जणांना वनस्थलीपुरम पोलिसांनी गणेश पंडालमधून लाडू चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली. के प्रध्वी राजू आणि बी महेश अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघेही 19 वर्षांचे आहेत. संयोजकांनी गुन्हा दाखल केल्याने रविवार, 25 सप्टेंबर रोजी संशयितांना अटक करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)