इंग्लंडच्या कॉर्नवॉलमध्ये काम करणाऱ्या एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाला शिकवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या शिक्षकाला शाळेतूनही काढून टाकण्यात आले आहे. या शिक्षकाने ऑनलाईन सेक्स ऑफर दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. थॉमस हेयल असे या शिक्षकाचे नाव असून तो 31 वर्षांचा आहे. न्यूक्वे जवळील सेंट कोलंब मायनर अकादमीमध्ये तो शिकवत होता. हेयलने 1 सप्टेंबर 2019 रोजी सेंट कोलंब मायनर येथे शिकवण्यास सुरुवात केली होती. थॉमसवर आरोप आहे की त्याने स्वतःची अयोग्य छायाचित्रे ऑनलाइन पोस्ट केली व देहविक्री करण्याचा प्रयत्न केला. यानंतर गेल्या उन्हाळ्यात त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले.
हेयल, 1 फेब्रुवारी 2020 ते 31 जुलै 2020 दरम्यान स्वत:चे अयोग्य फोटो पोस्ट करून, इंटरनेटवर सेक्स सर्व्हिसची ऑफर दिल्याबद्दल दोषी आढळला. हेयलच्या अशा वर्तनामुळे शिक्षक पेशाला कलंक लागू शकतो, यामुळे त्याला शाळेतून काढण्यात आले.
Cornwall teacher banned for offering sex services online https://t.co/aKSg2jImLg
— BBC Radio Cornwall (@BBCCornwall) July 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)