तुम्ही निवांत मेट्रोतून प्रवास करत आहात. ऑफिसहून थकून घरी परत येत आहात किंवा उत्साहात शॉपिंगला जात आहात तेवढ्या भुलभुलैया सिनेमाचं सुप्रसिध्द हॉरर पात्र अचानक तुमच्या डोळ्यापूढे येवून उभं राहिल तर घाबरगूंडी तर उडणारचं आहे. पण ही काही काल्पनिक गोष्ट नाही तर दिल्ली मेट्रोतील प्रवाशांसोबत खरोखर असं घडलं आहे. मेट्रोतून प्रवासी प्रवास करीत असतांना अचानक भुलभुलैया सिनेमातील हॉरर पात्र मंजूलीकाच्या वेशात एक तरुणी पूढे येवून ठेपली आणि मंजूलीकाप्रमाणे बंगालीत संवाद करु लागली. काही प्रवाशांनी घाबरुन जागा बदलल्या तर काहींनी हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. दिल्ली मेट्रोतील मंजूलीकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)