Man Marries Mother-In-Law: बिहारच्या बांका येथे एक विचित्र प्रेम प्रकरण समोर आले आहे. येथे जावई सासूच्या प्रेमात पडला. हलू हलू दोघांमधील प्रेम फुलू लागले. हा प्रकार सासऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने जावयाशी आपल्या पत्नीचे लग्न लावून दिले. आता हे प्रकरण संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. बांका पोलीस ठाण्यांतर्गत छत्रपाल पंचायतीच्या हीर मोती गावातील हे प्रकरण आहे. सिकंदर यादव असे या जावयाचे नाव असून, गीतादेवी असे सासूचे नाव आहे.

अहवालानुसार, पत्नीच्या निधनानंतर सिकंदर यादव हे आपल्या सासरी राहू लागले. यावेळी ते आणि सासू गीतादेवी एकमेकांच्या जवळ आले. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. गीतादेवी यांच्या पतीला म्हणजेच सिकंदरच्या सासऱ्याला याचा संशय आल्याने त्याने दोघांकडे याची विचारणा केली. दोघांनी काहीही न लपवता आपल्या प्रेमसंबंधाबाबद्दल माहिती दिली. पुढे सिकंदरने पंचायत आणि गावकऱ्यांसमोरही आपले सासूवरील प्रेम व्यक्त केले. यानंतर गीतादेवी यांच्या पतीने आपल्या जावयासोबत पत्नीचा विवाह लावून दिला. एवढेच नाही तर त्यांनी कोर्टातही लग्न लावून दिले. सध्या या अनोख्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: UP Horror: लग्नासाठी राजी न झाल्याने संतापलेल्या प्रियकराने तरुणीला 3 दिवस ओलीस ठेवून केला बलात्कार, गरम लोखंडी रॉडने केली बेदम मारहाण)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)