मुंबई मध्ये कल्याण येथील चिंचपाडा येथील भागामध्ये रहिवासी भागामध्ये बिबट्या आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, हा बिबट्या इमारतीमध्ये घुसल्यानंतर तो मानवी वस्तीत आल्याचं लोकांच्या निदर्शनास आलं. सध्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी पोहचले आहेत. बिबट्या आढळल्यानंतर इमारत रिकामी करण्यात आली आहे. आता बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नक्की वाचा: Leopard in Nashik: नाशिक मध्ये घरात आढळला बिबट्या (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)