दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींच्या तिसर्‍या टर्म मध्ये  शपथविधीदरम्यान X (पूर्वीचे Twitter) नेटिझन्सद्वारे शेअर केलेले अनेक व्हिडिओमध्ये एक बिबट्या कथितपणे चालताना दिसल्याचा दावा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्ययांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेअर करत नेटिझन्सनी असा दावा केला की तो प्राणी, बहुधा बिबट्या असावा , जो राष्ट्रपती भवनात फेरफटका मारताना दिसला.नेटिझन्स च्या म्हणया प्रमाणे ही घटना दुर्गा दास उईके आणि मध्य प्रदेशातील खासदार, मंचावर त्यांची शपथ घेत असताना घडली. व्हायरल क्लिपमध्ये मंत्र्यांच्या मागे  एक प्राणी चालताना दिसत आहे जेव्हा मंत्री दुर्गा दास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अभिवादन करतायात. क्लिपने नेटिझन्सना प्राण्याचा अंदाज लावायला भाग पाडलं आहे. अनेकांनी तो बिबट्या असल्याचा दावा केला तर काही जण म्हणतात तो एक पाळीव प्राणी आहे. हेही वाचा: Suresh Gopi मोदी सरकार मधील मंत्रिमंडळातून बाहेर पडणार? भाजपाच्या केरळ मधील पहिल्या खासदाराने फेटाळलं वृत्त

 

 

 

राष्ट्रपति भवन मध्ये बिबटा दिसला 

 

बिबट्या फिरताना दिसला, X वापरकर्त्याचा दावा

 

दुर्गा दास उईके यांनी घेतली शपथ

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)