गोरेगावमधील आरे दूध डेअरीमध्ये बिबट्या घुसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये म्हटले गेले आहे की, आरे मिल्क कॉलनीमध्ये बिबट्या फिरत आहे. व्हिडीओमध्ये एक बिबट्या फिरताना दिसत आहे. मात्र, या व्हिडीओची सत्यता तपासली असता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ दोन महिने जुना आहे. तेलंगणामध्ये डिसेंबर महिन्यात ही घटना घडली होती. त्यावेळी संगारेड्डी येथील हेटेरोच्या औषध निर्मिती युनिटमध्ये बिबट्या घुसला होता. बिबट्याने संपूर्ण रात्र प्लांटमध्ये काढली होती. सुरक्षा कर्मचार्‍यांनी याबाबत पोलीस आणि वन अधिकार्‍यांना सूचित केल्यानंतर, या बिबट्याची सुटका करण्यात आली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)