आजपर्यंत तुम्ही ही म्हण ऐकली असेल की, ‘पाण्यात राहून मगरीशी दुष्मनी करणे योग्य नाही.’ सर्वसाधारणपणे पाण्यात असलेल्या मगरीशी कोणीही वैर घेत नाही, नाहीतर ती गोष्ट स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देणे ठरू शकते. अशात मगरीची शिकार करणे ही तर आवाक्याबाहेरील गोष्ट आहे. परंतु सोशल मिडियावर शिकारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक बिबट्या पाणी पिण्यासाठी तलावाकाठी येतो. इतक्यात त्याच्यावर एक मोठी मगर हल्ला करते त्यानंतर मगर या बिबट्याला पाण्यात घेऊन जाते. परंतु स्वभावाप्रमाणे बिबट्या या मगरीशी दोन हात करतो आणि शेवटी तोच मगरीची शिकार करून तीला आपल्यासोबत पाण्याबाहेर घेऊन जातो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)