दुचाकीवर स्टंट करणे दुचाकीस्वाराला चांगलेच महागात पडले आहे. भरदुपारी आपल्या वेगवान बाईकवर स्टंट करत रस्तावरुन जाताना दोन तरुन रस्तादुभाजकाला धडकले आणि चांगलेच आदळले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कर्नाटक पोलिसांनी या दोन्ही युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे. ही घटना कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यातील हगरीबोमनहळ्ळी परिसरात घडली. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते दुकाकीवर दोन तरुण बसले आहेत. त्यापाकी दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने स्टंट करत दुचाकीचे पुढचे चाक हवेत उचलले आहे. मागचा त्याच दुचाकीवर बसला आहे. दरम्यान, तोल सावरता न आल्याने ही भरधाव दुचाकी थेट जाऊन दुभाजकाला धडकील. पोलिसांनीय या दोन्ही दुचाकीस्वारांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि विनाहल्मेट दुचाकी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घडलेल्या अपघातात दोन्ही तरुण किरकोळ जखमी झाल्याचे समजते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)