इंस्टाग्रामवर लोकप्रिय असलेला आदर्श शुक्ला याला मुंबई विभागातील रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. रेल्वे ट्रॅकवर बसून धूम्रपान करत असतानाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. यासंदर्भात ट्विटरवर तक्रार आल्यानंतर आरपीएफ आयटी सेल- आयपीएफ बदलापूर आणि आयपीएफ कल्याण यांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आरोपीच्या कारचा रजिस्ट्रेशन नंबर घेऊन त्याचा शोध काढला आणि त्याला अटक केली.
अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्याला तो व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले आणि अशा प्रकारचे व्हिडिओज शूट माफी मागण्यासही सांगितले. "तुम्ही माझ्यासारखे कोणतेही कृत्य करु नका. मी माझ्या कृत्याबद्दल क्षमा मागतो," असे आदर्शने आपल्या फॉलोअर्संना सांगितले आहे. सेंटर रेल्वे आरपीएफच्या युट्युब चॅनलवर देखील हा आदर्शचा माफीचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)