Viral Video: ग्राहकाला Dairy Milk Chocolate मध्ये दिसला जिवंत किडा; Cadbury ने घेतली पोस्ट ची दखल

'एक्स्पायरी जवळ असलेल्या प्रोडक्ट्सची गुणवत्ता तपासणी केली जाते का? असा प्रश्न त्याने विचारला आहे.

Viral Video: ग्राहकाला Dairy Milk Chocolate मध्ये दिसला जिवंत किडा; Cadbury ने घेतली पोस्ट ची दखल
Cadbury Dairy Milk | Twitter

Cadbury Dairy Milk च्या चॉकलेट बार मध्ये एका व्यक्तीला किडा वळवळताना दिसला. त्याने हा प्रकार X वर पोस्ट केला आहे. दरम्यान त्याने पोस्ट केलेल्या माहितीनुसार हैदराबादच्या मेट्रो स्टेशन वर त्याने ही कॅडबरी खरेदी केली होती. Robin Zaccheus असं या व्यक्तीचं नाव असून त्यने बिल देखील पोस्ट केलं आहे. Ameerpet metro station जवळ असलेल्या Ratnadeep Retail म्हणून त्याने ही कॅड्बरी घेतली. ' एक्स्पायरी जवळ असलेल्या प्रोडक्ट्सची गुणवत्ता तपासणी केली जाते का? असा प्रश्न त्याने विचारला आहे. यावर कॅडबरी ने ग्राहकाच्या पोस्टला प्रतिसाद देत अधिक तपशील मागवले आहेत.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 11, 2024 09:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).