Fungus on Cadbury Dairy Milk: याआधी देशातील नामवंत कंपनींची अनेक खराब उत्पादने बाजारात आढळली आहेत. आता हैदराबादमध्ये कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटबाबत असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने चॉकलेटचे रॅपर उघडले असता, त्याला ते बुरशीने भरलेले आढळले. याबाबत पीडितेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या बुरशी लागलेल्या डेअरी मिल्कचा फोटो शेअर करून कंपनीला कारवाई करण्याचे आवाहन केले. युजरने इन्स्टाग्रामवर चॉकलेटचे वेगवेगळे फोटो पोस्ट केले आहेत, या व्यक्तीने सांगितले की चॉकलेटच्या पॅकेजिंगवर जानेवारी 2024 अशी तारीख आहे आणि ते पुढील 1 वर्षासाठी चांगले राहील अशी अपेक्षा होती, मात्र असे असूनही चॉकलेटला बुरशी लागल्याचे दिसून आले. (हेही वाचा: US Rejected MDH Exports: अमेरिकेने ऑक्टोबर 2023 पासून नाकारल्या एमडीएचने निर्यात केलेल्या 31 टक्के शिपमेंट्स; समोर आले 'हे' कारण)

पहा फोटोज- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)