दूरसंचार कंपन्या सतत त्यांच्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात. खास प्रसंगी किंवा सणांच्या वेळी तर अशा अनेक ऑफर्स पहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार एका खास योजनेअंतर्गत सर्व यूजर्सना 28 दिवसांसाठी मोफत मोबाईल रिचार्ज देणार असल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार 'मोफत मोबाईल रिचार्ज स्कीम' अंतर्गत 28 दिवसांसाठी सर्व वापरकर्त्यांना 239 रुपयांचे फ्री रिचार्ज देत आहे. मेसेजमध्ये लोकांना रिचार्जसाठी लिंकवर क्लिक करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अशा मोफत रिचार्जचा लाभ कधी पर्यंत घेऊ शकाल याची माहितीही मेसेजमध्ये देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकच्या पथकाने त्याची चौकशी केली. ज्यामध्ये असे आढळून आले की व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णपणे खोटा आहे. हा संदेश आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करताना पीआयबीने म्हटले आहे की, हा दावा खोटा आहे, केंद्र सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)