देशात नुकतीच सुरु झालेली 5जी सेवा ही एक मोठी क्रांती समजली जात आहे. जवळजवळ सर्वजण लवकरात लवकर आपल्या फोनमध्ये 5जी सुरु करण्यासाठी उत्सुक आहेत. सध्या जिओ आणि एअरटेल काही निवडक शहरांमध्ये 5जी सेवा पुरवत आहेत. अशात सोशल मिडियावर एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, भारतात यापुढे 3G, 4G स्मार्टफोनचे उत्पादन होणार नाही. सरकारने सर्व मोबाईल उत्पादकांना 10 हजारांपेक्षा कमी किमतीच्या 3G, 4G मोबाईलचे उत्पादन थांबवण्यास सांगितले आहे आणि 10 हजारांपेक्षा जास्त किंमत असलेल्या सर्व मोबाईलमध्ये 5G कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, असेही नमूद केले आहे.
अनेक माध्यमांनी ही बातमी दिल्यानंतर ती व्हायरल होऊ लागली. आता PIB Fact Check ने याची तपासणी केली असता ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे. पीआयबीने नमूद केले आहे की, ही बातमी फेक आहे. भारत सरकारने मोबाईल उत्पादकांना अशी कोणतीही सूचना दिलेली नाही.
कुछ मीडिया रिपोर्ट्स में दावा किया जा रहा है कि भारत सरकार ने स्मार्टफोन कंपनियों को 3G और 4G स्मार्टफोन की मैन्युफैक्चरिंग बंद करने का निर्देश दिया है#PIBFactCheck:
▶️ यह खबर #फ़र्ज़ी है
▶️ भारत सरकार ने ऐसा कोई निर्देश नहीं दिया है pic.twitter.com/EE2k3xss3E
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)