दसरा उत्सवासाठी म्हैसूर पॅलेसमध्ये आणलेले हत्ती शुक्रवारी रात्री बेभान झाल्याचं पहायला मिळालं आहे. कांजन (Kanjan) आणि धनंजया हे दोन हत्ती जेवणाच्या वेळी एकमेकांना भिडले. नंतर धनंजयाने कांजनचा राजवाड्याच्या बाहेर पाठलाग केला. माहूत नसलेल्या कांजन मुळे काही काळ दहशत निर्माण केली. बॅरिकेट्सही तुटले.  मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. माहुत यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हत्तींना आटोक्यात आणण्यात आले.

म्हैसूर पॅलेस मधील हत्ती  भिडले

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)