Bharuch Viral Video: गुजरातच्या भरूच जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या अंकलेश्वर येथील एका हॉटेलमध्ये एका खासगी कंपनीने, नोकरीची मुलाखत आयोजित केली होती. ही वॉक-इन मुलाखत असल्याने, या ठिकाणी तरुणांची इतकी गर्दी झाली की अक्षरशः चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. मुलाखतीसाठी प्रथम प्रवेश करण्याच्या प्रयत्नात तरुणांच्या जमावाने एकमेकांना धक्काबुक्की केली. यावेळी तेथे लावलेले रेलिंगही कोसळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेबाबत भरूच जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी याचा संबंध बेरोजगारीशी जोडला आहे, माहितीनुसार, अंकलेश्वर येथील लॉर्ड्स प्लाझा हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. तेथे थरमॅक्स कंपनीतर्फे वॉक इन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीने 10 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या होत्या, परंतु हजारो तरुण मुलाखतीसाठी आले होते. (हेही वाचा: Viral Video: ओडिशात डिनर पार्टीदरम्यान स्टेजवर गाताना हृदयविकाराच्या झटक्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा मृत्यू, पहा व्हिडिओ)
पहा व्हिडिओ-
नरेंद्र मोदी का गुजरात मॉडल
गुजरात के भरूच में एक होटल की नौकरी के लिए बेरोजगारों की भारी भीड़ जुट गई.
हालात ऐसे बने कि होटल की रेलिंग टूट गई और गुजरात मॉडल की पोल खुल गई.
नरेंद्र मोदी इसी बेरोजगारी के मॉडल को पूरे देश पर थोप रहे हैं. pic.twitter.com/1GPXkqeMsk
— Congress (@INCIndia) July 11, 2024
गुजरातमें अंकलेश्वर की एक होटल में जब बेरोजगार युवकों नौकरी के लिए इंटरव्यू देने पहुंचे तो युवकों की भीड़ इतनी ज्यादा थी कि होटल की रेलिंग टूट गई.
देखिए गुजरात मॉडल बेरोजगारी... pic.twitter.com/M66zRFTy2q
— Kamlesh Patel (KP) (@KamleshPatel_) July 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)