‘अटल सेतू’ अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. नुकतंच १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पूलाचं उद्घाटन करण्यात आलं. या सागरी सेतूमुळे मुंबईतील प्रवास आणखी जलद झाला आहे. या पूलाचे काही नियम आहेत. या पूलावर केवळ 4 चाकी गाड्याच धावू शकतात. मात्र तरी देखील या पूलावर चक्क एक ऑटो रिक्षा धावतांना दिसत आहे. या रिक्षाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर यावर ऑटोरिक्षा चालकावर आता पोलिसांकडून कारवाई होणार आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)