Video- Lightning Kills Player During Football Match: इंडोनेशियामध्ये रविवारी, 11 जानेवारी रोजी फुटबॉल सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. सामना खेळत असताना एका फुटबॉलपटूवर वीज पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फुटबॉलपटू त्याच्याकडे चेंडू येण्याची वाट पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर अचानक त्याच्यावर वीज पडते आणि तो मैदानावर पडतो. मैदानावरील इतर खेळाडू या घटनेने पूर्णपणे घाबरून जातात. या खेळाडूला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. (हेही वाचा - Sarnath Express Shooting: रायपूर रेल्वे स्थानकावर अपघाती गोळीबारात आरपीएसएफ जवान ठार, एक प्रवासी जखमी (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)