Sarnath Express Shooting: छत्तीसगडमधील रायपूर रेल्वे स्थानकावर (Raipur railway station) शनिवारी रेल्वे संरक्षण विशेष दलाच्या (RPSF) जवानाच्या बंदूकीतून चुकून अपघाती गोळीबार (Firing) झाला. यात जवान ठार झाला असून एक प्रवासी जखमी झाला. येथील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना सकाळी 6 च्या सुमारास घडली. एका उपनिरीक्षकाच्या नेतृत्वाखालील RPSF टीम ड्युटी संपल्यानंतर सारनाथ एक्सप्रेस ट्रेनमधून उतरत असताना ही घटना घडली.
कॉन्स्टेबल दिनेश चंद्र (वय, 30) हे रेल्वेच्या एस-2 डब्यातून बाहेर पडत असताना त्यांचे सर्व्हिस वेपन चुकून निसटले आणि त्यांच्या छातीत गोळी लागली. या अपघातात वरच्या बर्थवर झोपलेल्या मोहम्मद दानिश नावाच्या एका प्रवाशालाही पोटात दुखापत झाली आहे. (हेही वाचा -VIDEO- Abhishek Ghosalkar Shot Dead: शिवसेना यूबीटी नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या; नंतर आरोपी मॉरिस भाईने स्वतःलाही संपवले (Watch))
पहा व्हिडिओ -
रायपुर : सारनाथ एक्सप्रेस में आरक्षक से चली गोली हादसे में आरक्षक दिनेश चंद्र के एआरएम से चली गोली,आरक्षक को लगी गोली ,हादसे में एक यात्री भी घायल अस्पताल में किया गया भर्ती इलाज जारी @RailMinIndia @RaipurPoliceCG#Raipur pic.twitter.com/x06Ti6wOnk
— Ranjeet kumar Yadav (@RanjeetkrYdv) February 10, 2024
दोघांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. मृत जवान राजस्थानचा रहिवासी होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.