आज जगभरात लव्हबर्ड्स आणि कपल्स 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करत आहेत. अशात एका प्रेमभंग झालेल्या तरुणाने 20 रुपयांच्या नोटेवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत व आता ही नोट व्हायरल झाली आहे. या तरुणाने नोटेवर 'राशी बेवफा है' असे नमूद केले आहे. तेव्हापासून ट्विटरवर या नोटेचा फोटो व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. अनेकानीन या नोटेचा फोटो शेअर करत आता ही 'राशी' कोण आहे अशी विचारणा केली आहे.

यापूर्वी 2016 च्या सुरुवातीला काही नोटांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यावर 'सोनम गुप्ता बेवफा है' असे शब्द नमूद केले होते. महत्वाचे म्हणजे या घटनेवर एक चित्रपटदेखील आला होता. त्याचप्रकारे आता राशी व्हायरल झाली आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर वर #YeRashiKonHai अशा हॅशटॅगसह अनेकांनी ट्वीट केले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)