जागतिक आर्थिक परिषदेला आजपासून दावोस येथे सुरूवात झाली. या परिषदेसाठी  उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत उपस्थित आहेत. पहिल्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करण्यात आले. देशाच्या ५ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था उभारण्याच्या प्रयत्नात महाराष्ट्र अग्रणी असून राज्याने एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

शिष्टमंडळाने आज इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली. राज्य पॅव्हेलियनमध्ये भेट घेतलेल्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये  पॅकेजिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या जपानच्या पर्यावरण स्नेही सनटोरी कंपनीच्या प्रतिनिधींसोबत महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. तर रसायन क्षेत्रातील बहुराष्ट्रीय यू पी एल या कंपनीने रायगड जिल्ह्यात २५० एकर भूखंडावर गुंतवणूक करण्यास पसंती दिली असून त्यासंबधी चर्चा केली.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ग्लोबल प्लास्टिक ॲक्शन पार्टनरशिप यांचे समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. २०१८ मध्ये एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)