Mumbai: मुंबईतील एपीएमसी मार्केट (APMC Market) मधून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका धान्य मार्केटमध्ये साफ सफाई करताना एका महिलेच्या अंगावर गोण्यांची थप्पी कोसळली. यात महिलेच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे माथाडी कामगारामुळे या महिलेचा जीव वाचला. कामगारांनी महिलेच्या अंगावर गोण्या पडताना पाहिल्या. त्यानंतर त्यांनी तात्काळ गोण्यांचा ढीग सरकवला.
पहा व्हिडिओ -
नवी मुंबई : सफाई करताना धान्याच्या गोण्या महिलेच्या अंगावर, माथाडी कामगारांची वेळीच धाव; घटनेचा cctv व्हिडिओ pic.twitter.com/SSFHjIXQSb
— Maharashtra Times (@mataonline) March 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)