Anjaneri Waterfall Rescue Video:  महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. अंजनेरी धबधब्यावर मुसळधार पावसामुळे पर्यटक अडकले होते. वन अधिकाऱ्याना या घटनेची माहिती मिळताच, बचाव कार्य सुरु झाले. सुमारे ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पर्यटकांची यशस्वीपणे सुटका करण्यात आली.अधिकाऱ्यांनी मानवी साखळी करून सर्वांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी मार्गदर्शन केले. मुसळधार पावसामुळे अनेक पर्यटक अडकले होते त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (हेही वाचा-रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ रेल्वे रुळावर दरड कोसळली, अनेक गाड्या थांबल्या, प्रवासी चिंतेत (Watch Video)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)