कोकणात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातला हापूस आंबा मोठ्या प्रमाणात नवी मुंबईतल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या फळ मार्केटमध्ये दाखल होत आहेत. कोकणातल्या आंब्यासोबतच राज्याच्या विविध भागांतूनही आंबा दाखल होत आहे.

आज एका दिवसात राज्यभरातून 95 हजार 439 आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. आवक वाढली तरीही सध्या 4 डझनच्या आंब्याच्या पेटीचा दर 1,200 ते 3,350 रुपयांपर्यंत आहे. या दरात फार घरसण होण्याची शक्यता नसल्याचे फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)