याआधी रस्त्याकडेला ओंगळवाण्या पद्धतीने बनवले जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. मात्र आता मॉलमध्येही खाणे जीवाशी खेळणारे ठरू शकते. एफडीए ठाण्याने उपवन येथील गोदामावर छापा टाकून कालबाह्य झालेला पिझ्झा बेस जप्त केला आहे. महत्वाचे म्हणजे ही उत्पादने सध्या कोरम मॉल येथील शिकागो पिझ्झा या रेस्टॉरंटमध्ये वापरली जात आहेत. शिकागो पिझ्झा हे क्लासिक पिझ्झा आणि मॉकटेल देणारे एक लोकप्रिय फास्ट-फूड चेन जॉइंट आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)