Thane Accident: महाराष्ट्रातील ठाणे शहरातील घोडबंदर रोडवर गुरुवारी सकाळी तेलाचा टॅंकर उलटला आहे.  या अपघातात चालक जखमी झाला आहे. अपघातानंतर काही काळ या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघात झाल्यानंतर तात्काळ ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापकाला सांगण्यात आले. मिळालेल्या माहिती नुसार, टॅंकर हा कोल्हापूरहून गुजरातमधील वापीकडे दिशेकडे जात होते. सकाळी 6.12 वाजता पाटलीपाडा पुलाजवळ हा अपघात झाला.  या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टँकर उलटल्याने त्यातून तेल रस्त्यावर सांडले. स्थानिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाने सतर्कता दाखवल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)