आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारी निवासस्थान सागर बंगल्यासमोर उपोषण करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने विविध ठिकाणी संचारबंदी लागू केली. त्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी काही काळ आंदलन शांततेत घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाने, काही ठिकाणी जाळपोळ केली असून राज्य परिवहन मंडळाची बस पेटविण्याचीही घटना घडली आहे. ही घटना नेमकी कोठे घडली आहे याबातब तपशील मिळू शकला नाही. मात्र, घटनेचा व्हिडिओ पीटीआय या वृत्तसंस्थेने आपल्या X हँडलवर शेअर केला आहे. तो आपण येथे पाहू शकता.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)