औरंगजेबाचे कौतुक केल्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी अडचणीत सापडले आहेत. मुघल सम्राटाची प्रशंसा केल्याच्या त्यांच्या विधानावरून आज विधानसभेतही मोठा गोंधळ झाला. त्यानंतर अबू आझमी यांना महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले. सपा आमदारांना विधानसभेच्या संपूर्ण अधिवेशनातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांना निलंबित ठेवण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडला. अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती करत, तो जुलमी नव्हता असे म्हटले. त्यांच्या या विधानावरून गेल्या दोन दिवसांपासून राजकारण तापले होते. मात्र, नंतर त्यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली आणि आपण आपले वक्तव्य मागे घेत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की,, ते फक्त इतिहासात जे लिहिले आहे तेच बोलले. या टिप्पणीमुळे अबू आझमी यांना त्यांच्या विरोधकांकडून सतत लक्ष्य केले जात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. आता त्यांना महाराष्ट्र विधानसभेच्या संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. (हेही वाचा: SP MLA Abu Azmi Aurangzeb Row: 'अबू आझमींनी भाजपला मदत करण्यासाठी हे विधान केले होते का?'; आमदार Rohit Pawar यांनी औरंगजेबावरील टिप्पणीबाबत उपस्थित केले प्रश्न)
अबू आझमींवर कारवाई, संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित-
महाराष्ट्र विधानसभा अपडेट | सपा विधायक अबू आज़मी को औरंगज़ेब पर दिए गए बयान के कारण सदन के बजट सत्र से निलंबित कर दिया गया।
सदन में महाराष्ट्र के संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटिल द्वारा उनके खिलाफ़ प्रस्ताव पेश किया गया। सदन ने प्रस्ताव को पारित कर दिया।
(तस्वीरें: विधानसभा… pic.twitter.com/wsFoEBKDW9
— ANI_HindiNews (@AHindinews) March 5, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)