मुघल सम्राट औरंगजेब याची कबर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्दाबाद येथे स्थित आहे. सध्या या कबरीबाबत अनेक वाद निर्माण झाले आहेत. काही लोकांची ही कबर हटवण्याची मागणी आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी त्यांनी औरंगजेबाची कबर हे एक संरक्षित स्थळ आहे, मात्र त्याचे कोणत्याही प्रकारचे उद्दात्तीकरण होऊ देणार नाही, असे सांगितले. त्यांनी नमूद केले की, ही कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अंतर्गत संरक्षित स्थळ आहे आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्यानंतरच ती हलवता येते. कोणाला औरंगजेब आवडो किंवा न आवडो, कायद्याने या कबरीला संरक्षण मिळाले आहे व हे एक संरक्षित स्मारक आहे आणि ती हटवण्याची परवानगी नाही. आम्हाला कायद्याचे पालन करावे लागेल. मात्र त्याचे उद्दात्तीकरण होता कामा नये.
औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शने केली. मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये निदर्शने करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या गटांनी इशारा दिला की, जर राज्य सरकारने कारवाई केली नाही तर ते प्रकरण स्वतःच्या हातात घेतील आणि कबर स्वतः पाडतील. *हेही वाचा: Ban On Sale Of Non-Veg During Navratri In Mumbai: मुंबईत नवरात्रीत रस्त्यावर मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याची Sanjay Nirupam यांची मागणी; म्हणाले- 'दुखावल्या जात आहेत हिंदूंच्या भावना')
Aurangzeb's Tomb Row:
#BREAKING | Maharashtra CM Devendra Fadnavis issues a strong statement amid ongoing Aurangzeb Tomb row and warns against glorifying the Mughal emperor.
.
.
.#MaharashtraCM #DevendraFadnavis #Aurangzeb #AurangzebTombRow #AurangzebTomb #Fadnavis pic.twitter.com/0lRRTJHwca
— Republic (@republic) March 31, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)