सिंधुताई सपकाळ या 'अनाथांची माय' अशी ओळख असणार्या समाजसेविका यांनी आज पुण्यामध्ये गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. राजकारण, सिनेक्षेत्र ते अगदी सामान्य नागरिकांसाठी प्रेरणास्थान असलेल्या सिंधुताईंच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. सिंधुताई यांच्या निधनावर आज सार्याच क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्यपाल
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला - मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले.
— Governor of Maharashtra (@maha_governor) January 4, 2022
शरद पवार
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे.
अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 4, 2022
लता मंगेशकर
वात्सल्यसिंधु, अनाथांच्या आई थोर समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच मला अत्यंत दुःख झाले. त्यांच्या निधनाने समाजाची अपरीमित हानी झाली आहे. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देउन आम्ही त्यांचा गौरव केला होता. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति प्रदान करो.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) January 4, 2022
सुप्रिया सुळे
'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले.अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. pic.twitter.com/HmYSOTLEbG
— Supriya Sule (@supriya_sule) January 4, 2022
धनंजय मुंडे
माईंच्या जाण्याने अनाथ, दीन-दुबळ्यांचे हक्काचे आशा स्थान काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण आदरांजली माई... (2/2)
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 4, 2022
रोहित पवार
ज्येष्ठ समाजसेविका आणि हजारो अनाथ मुलांची माय, पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७३) यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजकार्याचा एक वेगळा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.🙏💐
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/ff7439GGIY
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 4, 2022
नाना पटोले
अनाथांची माय, ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी मिळाली.
महाराष्ट्राची माय, अनाथांची माय आमच्यात नाही, याचा दुःख आज महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला आहे.
त्यांना महाराष्ट्र कॉंग्रेस तथा माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/ybCT2HxLeQ
— Nana Patole (@NANA_PATOLE) January 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)