निवडणूक आयोगाने काल एक महत्वाचा निर्णय देत शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने तीन नावे आणि चिन्हांची यादी दिली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. नावासाठी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' ही पहिली पसंती, 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ही दुसरी आणि 'शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे' तिसरी पसंती असेल. उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल हे पर्याय दिले आहेत.
#NewsAlert | Uddhav Thackeray faction of the Shiv Sena submits a letter to the Election Commission regarding interim symbol and party name for the upcoming bypolls. pic.twitter.com/XtxwGDwyAv
— NDTV (@ndtv) October 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)