महाराष्ट्रात सत्तासंघर्षामध्ये आता शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत पुन्हा ईडीच्या रडार वर आले आहेत. संजय राऊतांना आज ईडीने पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये 28 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ते ट्वीटर आक्रमक झाले आहेत. हे मला रोखण्यासाठी कपट असून मला मुंडकं छाटलं तरीही मी  गुवाहाटी ला जाणार नाही.  असे ते म्हणाले आहेत. यामध्ये त्यांनी 'अटक करा' असंही लिहलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)