मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शनिवार दिनांक 25 फेब्रुवारी, 2023 रोजी सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूर, एस. व्ही. रोड, हिरालाल भगवती हॉस्पिटलजवळ, बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचा शुभारंभ होईल.
या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट संस्था व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याशिवाय विविध शासकीय आर्थिक विकास मंडळेही मेळाव्यात सहभागी होणार असून त्यांच्यामार्फत स्वयंरोजगारासाठी विविध समाज घटकांकरीता राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर, अभियंते अशा विविध क्षेत्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.
माझ्या दहिसर मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना रोजगार मिळावा म्हणून बोईसर येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
२५ फेब्रुवारी २०२३ रोजी ठिकाण : सेंट फ्रान्सिस ITI माउंट पोईसर, एसव्हीपी रोड, हिरालाल भगवती हॉस्पिटलजवळ, बोरिवली पश्चिम, मुंबई ४००१०३
— Manisha Chaudhary (@manishaBJP) February 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)