युवांच्या प्रश्नांसाठी संघर्ष यात्रा काढून पायी निघालेल्या आमदार रोहित पवार यांनी आज (26 ऑक्टोबर) अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपण हा अन्नत्याग करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काल सणसवाडी येथील एका जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली.
पहा ट्वीट
मराठा समाजाला संवैधानिक पद्धतीने आणि टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील हे अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यांना आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून #युवा_संघर्ष_यात्रा सुरू असताना उद्या (गुरुवार) एक दिवस मी अन्नत्याग करत आहे.#YuvaSangharshYatra #yuva… pic.twitter.com/xY4npdi4CS
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)